
वैभववाडी : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी...आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. वैभववाडीत नितेश राणेंनी ठाकरे गटाला खिंडार पाडलय. शिवकृपा मित्र मंडळ लोरे नंबर दोन मांजलकरवाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांनी नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय.
नितेश राणेंनी पक्ष संघटनावाढीसाठी पक्ष प्रवेशाचे धमाके सुरु केलेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला खिंडार पाडत आणखीन एक धक्का दिलाय. यावेळी मोहन मांजलकर, सुरेश मांजलकर, राजाराम मांजलकर, प्रकाश मांजलकर, संतोष मांजलकर, दिगंबर पानकर, प्रथमेश आग्रे, सत्यवान मांजलकर,सागर पानकर, मयूर मांजलकर, चंद्रकांत मांजलकर, हरेश मांजलकर, अनंत तर्फे यांनी भाजपात प्रवेश केला. नितेश राणेंनी या कार्यकर्त्यांच स्वागत केलं. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी आणि पदाधिकारी उपस्थितीत होते.