
कणकवली : मनोज रावराणे व सरपंच अजय रावराणे यांच्या संकल्पनेतून लोरे नंबर १ या गावामध्ये सुंदर माझं गाव लोरे असा सेल्फी पॉईंट बनवण्यात आला. याचे उद्घाटन कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्यातील ग्रामीण भागात प्रथमच सेल्फी पॉइंट बनवण्याचा मान लोरे ग्रामपंचायतने मिळवला असून लोरे गाव जिल्ह्या मध्ये विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असतो असे मनोगत आ.राणेंनी व्यक्त केले. गावातील सरपंच आणि ग्रामस्थ यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रसंगी तुळशीदास रावराणे (सिंधुदुर्ग कृषी बाजार समिती अध्यक्ष) मनोज रावराणे( माजी सभापती कणकवली)अजय रावराणे सरपंच,सुमन गुरव उपसरपंच,नरेश गुरव, सुनील रावराणे,अनंत रावराणे,बाबा रावराणे,आणि गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.