एडगावातील शहीद विजय साळसकर स्मारक उजळले

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 26, 2025 18:15 PM
views 61  views

वैभववाडी : एडगाव येथील शहीद विजय साळसकर स्मारक आता प्रकाशमय झाले आहे. स्मारक परिसरात उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री  नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री राणे यांच्या प्रयत्नातून या स्मारकासाठी चार हायमास्ट दिव्यांची मंजुरी मिळाली असून, त्यांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र पोलीस अधिकारी विजय साळसकर शहीद झाले होते.त्यांच स्मारक मुळ गावी एडगाव येथे उभारण्यात आले. या स्मारकाच्या ठिकाणी चार हायमास्ट लावण्यात आले.यामुळे हा  परिसर प्रकाशमय होऊन अधिक आकर्षक  बनला आहे. नागरिकांना रात्रीच्या वेळी स्मारक परिसरात सुरक्षित व सोयीस्कर वातावरण मिळणार आहे.

या हायमास्टच लोकार्पण आज संपन्न झाले. याप्रसंगी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, एडगाव सरपंच सौ. रवीना तांबे, उपसरपंच प्रज्ञा रावराणे, रवळनाथ विकास सोसायटीचे चेअरमन सुनील रावराणे, बुथ अध्यक्ष विनोद रावराणे, तसेच राजू पवार, उत्तम सुतार, रत्नाकर कदम, रवींद्र रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी स्नेहलता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील नागरिक आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शहीद साळसकर यांना अभिवादन केले.