पालकमंत्री‌ नितेश राणे जिल्हा दौऱ्यावर

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 25, 2025 20:44 PM
views 661  views

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी २६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, ११ वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभागांची आढावा बैठक ( ठिकाण -  जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ), ११.४५ वा. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, कुडाळ मंडळच्यावतीने "सेवा पंधरवडा" यानिमित्ताने Vocal for Local च्या माध्यमातून स्वदेशी वस्तु, लघु उद्योजक व स्वयं उद्योग सहाय्यता गट यांच्या उत्पादन कार्यक्रमास उपस्थिती ( ठिकाण -  मराठा समाज हॉल, कुडाळ ), दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे बैठक असा त्यांचा दौरा आहे.