पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 26, 2025 20:15 PM
views 127  views

सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे रविवार २७ जुलै २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता मोटारीने मिरकरवाडा बंदर, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी १० वाजता "केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत मिरकरवाडा मासेमारी बंदराचा विकास करणे" या कामाच्या भूमिपूजन समारंभास मा.पालकमंत्री, रत्नागिरी यांच्या समवेत उपस्थिती, (स्थळ:- मिरकरवाडा बंदर, रत्नागिरी). सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कणकवली जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ:- भगवती मंगल कार्यालय, कणकवली ) दुपारी 1 वाजता मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता चिपी विमानतळावर आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.