उबाठा केवळ काँग्रेसच्या कुबड्यावर जिवंत !

नितेश राणेंची टीका
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 05, 2024 11:52 AM
views 294  views

कणकवली : संजय राजाराम राऊत कसली दिवाळी आणि आनंद साजरा करतोय समजत नाही. जेवढे भाजपचे खासदार निवडून आलेत तेवढे पण इंडिया आघाडीचे नाहीत. मोदी दीड लाखाच्या लीड ने निवडून आलेत. तुझ्या मालकाच्या मुलाच्या वरळी मतदारसंघात फक्त 5 हजारांचे लीड आहे. आधी त्याला राजीनामा द्यायला सांग, नंतर मोदींचा राजीनामा माग. 21 जागा लढवून केवळ 9 जागांवर उबाठा चा विजय झालाय. उद्धव चे तोंड काळे झाले आहे. उद्धव ने मातोश्री मधून बाहेर पडून 10 जनपथ वर वॉचमन ची नोकरी करावी. उबाठा केवळ काँग्रेसच्या कुबड्यावर जिवंत आहे आणि म्हणे केंद्रात सरकार बनवतो. पूर्ण कोकणात उबाठा साफ झाली आहे. असा घणाघात भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.

आमदार नितेश राणे म्हणाले, राणे संपले म्हणणारे कोणत्या बिळात लपून बसले आहेत.त्यांनी आता डोळे उघडून पहावे.ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपा शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार जिंकलेत. संजय राजाराम राऊत ने सिंधुदुर्गात यावे, निवडणूक विश्लेषण काय असते हे दाखवून देतो.कोकणी जनतेने उबाठा ला हाकलून लावले आहे. कोकणात आलेल्या प्रकल्पना विरोध करण्यासाठी उबाठा पूढे होती, आता उबाठा लाच जनतेने नाकारले आहे.सी वर्ल्ड, रिफायनरी सारखे प्रकल्प आता कोकणात उभे राहणार.स्थानिक बेरोजगारांना त्यांच्या मायभूमीत कोकणातच रोजगार मिळणार. सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येतील असा विश्वास सुद्धा नितेश राणे यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे यांनी लोकांना सत्य सांगितले. राणे साहेबांसाठी कणकवली त्यांनी सभा घेतली आणि जनतेला आव्हान केले. बाक वाजवणारे खासदार नको मंत्री होणारे राणे साहेब खासदार म्हणून निवडून द्या असे सांगितले. त्यांचेही यावेळी आमदार नितेश राणे यांनी आभार मानले.