गणेशोत्सव प्रदर्शन, खरेदी महोत्सवाला नितेश राणेंची भेट

नर्मदाआई संस्थेचे आयोजन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 15, 2025 20:37 PM
views 64  views

कुडाळ: नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाचे उद्घाटन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी आयोजकांचे कौतुक केले. ते म्हणाले, "असे उपक्रम जिल्ह्याबाहेर आयोजित करण्यासाठी प्राधान्य द्यावे. सत्तेत असताना अनेक जण सोबत असतात, पण अडचणीच्या काळात संध्या तेरसे, रणजीत देसाई आणि इतर कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले." कोकणातील वस्तूंना जिल्ह्याबाहेर मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे सांगत, यासाठी लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, मंत्रालयात तुमचा भाऊ मंत्री आहे, त्यामुळे मंत्रालयातही असे प्रदर्शन भरवण्यासाठी परवानगी मागू, असे त्यांनी सांगितले. कोणताही कार्यक्रम छोटा नसतो, तुम्ही एक चांगला उपक्रम करत आहात आणि असेच उपक्रम पुढेही करत राहा, असे सांगत त्यांनी आयोजकांना प्रोत्साहन दिले.

यावेळी संस्थेच्या संचालिका सचिव श्रीमती दिप्ती मोरे, संचालिका श्रीमती जान्हवी मोरे, सौ. प्राजक्ता तेरसे, सौ. मृणाल देसाई, सौ. अक्षता कुडाळकर, सौ. अनुजा तेरसे, सौ. आरती पाटील, सौ. साधना माड्ये, सौ. तेजस्विनी वैद्य, सौ. विशाखा कुलकर्णी, भाजप मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, सुनील बांदेकर, मोहन सावंत, सचिन काळप, माविम जिल्हा समन्वय नितीन काळे, प्रसाद तेरसे, तन्मय वालावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.