नितेश राणे यांनी शिरगांव हायस्कूलला दिली भेट

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 12, 2023 20:10 PM
views 57  views

देवगड : कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी शिरगांव हायस्कूलला भेट दिली.

शिरगांव हायस्कूलला भगीरथ प्रतिष्ठान झाराप यांच्या मदतीतून प्राप्त झालेला स्मार्ट डिजिटल बोर्डचा वापर अध्यापन अध्ययन प्रक्रियेत कसा केला जात आहे याची माहिती व त्याचे कार्य जाणून घेण्यासाठी नितेश राणेंनी  शाळेस भेट दिली. स्मार्ट बोर्डचे कार्य जाणून घेतले. यावेळी संदीप साटम ,मुख्याध्यापक अत्तार, मंगेश लोके, शैलेश जाधव, अमोल तेली, रवी पाळेकर उपस्थित होते.