नितेश राणेंचा ठाकरेंना जोरदार धक्का ; एकमेव राहिलेले नगरसेवक भाजपात

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 24, 2025 23:26 PM
views 547  views

वैभववाडी : तालुक्यात उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीतील एकमेव  नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नामदार नितेश राणेंच्या उपस्थितीत कणकवलीत हा पक्ष प्रवेश झाला. नगरपंचायतीतील ठाकरे सेनेचे संख्याबळ संपुष्टात आले आहे.

नाम.राणेंकडून उबाठाला एकावर एक धक्के देणे सुरुच आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील शिल्लक राहीलेल्या एकमेव नगरसेविकेने ठाकरे सेनेची साथ सोडली आहे. आज ओम गणेश बंगल्यावर महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते  भाजपामध्ये प्रवेश झाला. मंत्री राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

सौ.रावराणे यांच्या  प्रवेशामुळे नगरपंचायतीत भाजपचे संख्याबळ १७पैकी १७सदस्य झाले. आतापर्यंत ठाकरे सेनेतील पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली. आता नगरपंचायतीतील ठाकरे सेनेतील स्वीकृत नगरसेवक वगळता एकही नगरसेवक शिल्लक राहिले नाही. आजच्या प्रवेशावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, बँक संचालक दिलीप रावराणे, दीपक माईणकर आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.