ऑन लाईन लॉटरी विरोधात उबाठाचे पत्र हप्ते गोळा करण्यासाठी : नितेश राणे

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 07, 2024 09:51 AM
views 328  views

कणकवली : ऑन लाईन लॉटरी व जुगार बाबत अचानक गृहमंत्र्यांना पत्र लिहिण्याचे कारण काय? येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हप्ते गोळा करण्याचा हेतू उबाठा आणि संजय राऊत यांचा आहे.कंपन्यांना धमकावून चंदा जमा करायचा हाच उबाठा च्या नेते मंडळींचा धंदा आहे.या बाबत कोणाला कुठून कसे फोन गेले आहेत. ते मी लवकरच जाहीर करेन असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.ते कणकवलीत पत्रकारांशी बोलत होते 

आमदार नितेश राणे म्हणले, संजय राऊत ला हप्ते मातोश्रीला जमा करायचे आहेत. एवढे पैसे द्या, नाहीतर कारवाई करण्यासाठी भाग पाडू असे फोन गेलेले आहेत. रेकॉर्डिंग आहे. वेळ आली की बाहेर काढू असा इशारा दिला.महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. उबाठा महाविकास आघाडी सोबत राहील का? हेच सांगणे कठीण आहे.

सेना नेते रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे अधिकार आहेत. ते वरिष्ठांशी बोलतील. मात्र त्याच्या बोलण्याने अनेकांच्या मनात लड्डू फुटलेले आहेत. म्हणून महायुतीवर आमची अभेद्य आहे आम्ही एकत्र काम करणार मोदी साठी प्रत्येक जागेवर विजय मिळवून देणार असे आमदार नितेश राणे म्हणले. 

रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला एकत्र घेऊन पक्ष संघटना वाढवत आहेत. त्यांच्या बाबत गैरसमज रामदास कदम यांच्या पर्यंत पोचले असतील तर रवींद्र चव्हाण असे करणार नाहीत. पक्ष संघटना व कार्यकर्ते यांच्यात जोश निर्माण करण्याचे काम गोवाचे मुख्यमंत्री करत  आहेत. 

 प्रकाश आंबेडकर जी हे आघडी साठी पहिल्या दिवसापासून सकारात्मक दिसत आहेत. मात्र महाविकास आघाडी चे लोक त्यांचा  अपमान करत आहेत. लवकरच प्रकाश आंबेडकर आपली भूमिका जाहीर करतील.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.