उपद्रवी हत्तीला वनतारात हलवण्यासाठी नितेश राणे यांची वनमंत्र्यांशी चर्चा

Edited by: संदीप देसाई
Published on: September 23, 2025 21:49 PM
views 243  views

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील उपद्रवी आणि आजारी हत्तीला वनतारात हलवण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन चर्चा केली. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, हत्तीला सुरक्षितपणे वनतारात हलवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि वन्यजीव संरक्षण या दोन्ही दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, अशी माहिती या चर्चेनंतर देण्यात आलीय.