नितेश राणेंचा ठाकरे गटाला धक्का !

रहाटेश्वर सरपंच कल्पना कदम यांचा भाजप प्रवेश
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 28, 2023 18:50 PM
views 172  views

देवगड : देवगड रहटेश्वर गावच्या उबाठा सेनेच्या सरपंच कल्पना बलवंत कदम, ग्रामस्थ विनय कदम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला. राटेश्वरच्या सरपंच कल्पना कदम या उबाठाच्या सरपंचा होत्या. यामुळे ग्रामपंचायतीतील उभाठा सेनेची सत्ताही कल्पना कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे संपली आहे. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, अमित कदम, सुरेंद्र कदम, तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप साटम, यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार नितेश राणे हेच ग्रामीण भागाचा विकास करू शकतात हे लक्षात आल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केला असे कल्पना कदम यांनी यावेळी सांगितले आहे.