
वैभववाडी : उबाठा सेनेचे युवा सेना जिल्हा चिटणीस तथा शिवसेना वक्ते स्वप्निल धुरी तसेच तिथवली ग्रामपंचायतीचे दोन सदस्य, सोसायटी दोन संचालक व तिथवली दिगशी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी पक्ष कार्यालयात प्रवेश पार पडला. नामदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. वैभववाडी तालुक्यातील युवा ब्रिगेड भाजपात दाखल झाल्याने उबाठा गट नामषेश झाला आहे.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खांबाळे माजी उपसरपंच तथा युवा विभाग प्रमुख गणेश पवार, तिथवली सोसायटी संचालक जयराज हरयाण, संचालक चंद्रकांत धुरी, तिथवली ग्रामपंचायत सदस्य चित्रा हरयाण, सदस्य सायली धुरी, तालुका सचिव राष्ट्रवादी अजित पवार गट गणेश पवार, कोळपे जि.प. युवा सेना विभाग प्रमुख राजेश पवार, युवासेना उपतालुकाप्रमुख सत्यवान सुतार, शाखाप्रमुख दीगशी देवेंद्र पाष्टे, युवासेना उपविभाग प्रमुख जयेश पवार, दिगशी बुथ अध्यक्ष नरेंद्र धुरी, युवा सेना शाखाप्रमुख सागर पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पाटील, तसेच राहुल धुरी, रमाकांत धुरी, गणेश धुरी, सत्यवान शिवगण, नरेंद्र गोरुले, श्रीकांत धुरी, दिनकर साळवी, सिद्धेश सोलकर, प्रितेश परबते, विनोद मोरे, रामदास धुरी, गजानन धुरी, दत्ताराम धुरी, सतीश पवार, सुनील पवार, अनंत भोवड, साक्षी धुरी, नितीन सराफ, अनुपमा सराफ, सर्वेश मोरे, रवींद्र साळवी, रमेश गुरव, दीपक हरयाण, बाबू इस्वलकर, सिताराम उर्फ बबन धुरी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी वैभवाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, सज्जनकाका रावराणे, प्राची तावडे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, स्नेहलता चोरगे, सीमा नानवडेकर, शारदा कांबळे, नेहा माईणकर, संगीता चव्हाण, अतुल सरवटे, रितेश सुतार, संजय सावंत, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.