
सावंतवाडी : राज्याचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उबाठा शिवसेने नंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. श.प. राष्ट्रवादीचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे. आज नामदार राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
सावंतवाडी तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. उबाठा शिवसेनेनंतर राणेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेला मोठा धक्का आहे. मंत्री राणेंच्या उपस्थित सिद्धेश तेंडूलकर, प्रिया गावडे, मानसी निवजेकर, संतोष आसयेकर, भालचंद्र सावंत, प्रशांत मेस्त्री, महेश गवंडे यांसह ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासाला वेग आला आहे. सर्व समाजघटक आणि सिंधुदुर्गातील जनता त्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत आहे. आमच्या भागाचा विकास नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, असा विश्वास पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा संघटक महेश सारंग, रविंद्र मडगावकर, प्रमोद गावडे, चंद्रकांत जाधव, महेश धुरी आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.