वैभववाडी : मत्स व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा वैभववाडी भाजपाच्या वतीने शनिवार दि.२८डिसेंबर रोजी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. येथील भाजपा कार्यालयासमोर सकाळी ११वा हा कार्यक्रम होणार अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी दिली.
महायुतीच्या सरकारमध्ये आम.नितेश राणेंना मत्स व बंदर विकास मंत्री पदाची जबाबदारी मिळाली. याबद्दल वैभववाडी भाजपाच्यावतीने मंत्री राणे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुधीर नकाशे यांनी केले आहे.