दोडामार्ग : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांचा दोडामार्ग भाजप व शिवसेनेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने पुष्पृष्टी करत जल्लोषी स्वागत केले. दोडामार्गच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करीन असे यावेळो ना नितेश राणे यांनी बोलताना स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री झाल्या नंतर आज प्रथमच दोडामार्ग येथे ना नितेश राणे यांचे आमगमन होताच भाजप व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करण्याय आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत, जिल्हाबँक अध्यक्ष मनिष दळवी,भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हाउपाध्यक्ष राजन म्हापसेकर, महेश सारंग, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे, शिवसेनेचे तालुका प्रमुख गनणेशप्रासद गवस, भाजप महिला तालुका प्रमुख दिक्षा महालकर, नगरसेविका सोनल म्हावळणकर, गौरी पार्सेकर, संध्या प्रसादी, क्रांती जाधव, रुक्मिणी नाईक, सुजाता मणेरीकर, संजना म्हावळणकर भाजप शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी दोडामार्ग चौकातूम ना नितेश राणे यांची रॅली घोषणा बाजी करत भाजप कार्यालया पर्यंत काढण्यात आली.