भात पीक विक्री नोंदणीची मुदत वाढवून मिळावी

सावंतवाडी सहकारी खरेदी - विक्री संघाने वेधलं नितेश राणेंच लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2024 16:47 PM
views 189  views

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या काळात तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने सर्वच शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली नसल्याने शासकीय हमीभावाने भात पीक विक्री करताना अडचण निर्माण झाल्याने ई पीक आणि भात पीक विक्री नोंदणीची मुदत वाढवून मिळावी म्हणून प्रयत्न करण्याची मागणी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्यावतीने करण्यात आली. यावेळी निश्चितच मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

आमदार नितेश राणे सावंतवाडी मध्ये आले असताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, संचालक गुरूनाथ पेडणेकर, अभिमन्यू लोंढे, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे आदींनी निवेदन दिले. 

यावेळी निवडणूक काळात ई पीक नोंदणी करण्यात आली तेव्हा तलाठी कार्यालयात सर्व्हरचा प्रश्न निर्माण झाला तसेच तलाठी उपलब्ध नसत. पाऊसही सुरू होता त्यामुळे ऑनलाईन ई पीक नोंदणी बहुतेक शेतकरी करू शकलेले नाहीत त्यामुळे शासकीय हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता आहे असे चेअरमन प्रमोद गावडे व संचालक यांनी सांगितले. आमदार राणे म्हणाले, आपण ई पीक नोंदणी मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांचे भात पीक हमीभावाने खरेदी व्हावे म्हणून प्रयत्नशील आहे. ई पीक नोंदणी मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.