'अभाविप'च्या अधिवेशनला नितेश राणेंची भेट

Edited by: विनायक गांवस
Published on: December 12, 2024 15:01 PM
views 108  views

सावंतवाडी : भाजपा आमदार नितेश राणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशन कार्यालय सदिच्छा भेट दिली. २७,२८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोंकण प्रांताचे ५९ वे कोंकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने ही भेट आमदार नितेश राणेंनी दिली.

सावंतवाडी येथे आ नितेश राणे यांनी सदिच्छा भेट देत त्यांनी अधिवेशनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारत मातेची प्रतीमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी या अधिवेशनाला सचिन तेंडुलकर यांना आमंत्रित करण्यासंदर्भात विद्यार्थी परिषदेकडून आ.‌राणेंच लक्ष वेधलं. याला सकारात्मक प्रतिसाद नितेश राणे यांनी दिला.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, अधिवेशन स्वागतसमिती सचिव अतुल काळसेकर, व्यवस्था सहप्रमुख डॉ. राजशेखर कार्लेकर, शहरमंत्री स्नेहा धोटे, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर, तुषार पाबळे, विनीत परब, सौरभ दांडगे, सिद्धेश म्हापसेकर,दिग्विजय पाटील, जयवंत पवार, गौरी वारंग आदींसह भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महेश धुरी, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, मोहीनी मडगावकर, अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद गावडे, ज्ञानेश्वर सावंत, मधु देसाई, प्रविण देसाई, हनुमंत पेडणेकर, दिलीप भालेकर, संतोष गांवस, गुरू मठकर, उमेश पेडणेकर, ओंकार सावंत, संजय नाईक,  आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नितेश राणेंना पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.