कणकवलीत खुद्द उपजिल्हाप्रमुखांच्या घरातच फूट

Edited by:
Published on: November 07, 2024 16:06 PM
views 931  views

कणकवली : महायुतीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी कणकवली शहरात ठाकरे सेनेला आणखी एक झटका दिला असून ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह शिवसैनिकांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर कणकवली शहरात ठाकरे सेनेला आणखी गळती लागली असून खुद्द उपजिल्हाप्रमुखांच्या घरातच फूट पडली आहे. चानी जाधव यांच्यासह  राहुल वालावलकर रोशन जाधव यांनीही भाजपात प्रवेश केला.

 यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे  भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शिशिर परुळेकर ,अभय राणे  अण्णा कोदे  ,विराज भोसले, परेश परब ,सागर राणे आदी उपस्थित होते.