
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या सभेत आमदार नितेश राणे भाषण करताना बोलत होते. दीपक केसरकर हे फक्त शिवसेनेचे नाही तर महायुतीचे आहेत. आमच्यातील काही लोकांवर अचानक अन्याय होऊ लागला आहे. अडीच वर्षांत आमच्या सरकारने विकासकामं केली. दीपक केसरकर हे अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्रात शिक्षणमंत्री म्हणून क्रांती घडवणारे आमचे उमेदवार आहेत.
प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष बारकाईने आहे. कोणीही इकडेतिकडे करू नये. रात्री १० नंतर कोण कुठे काय करत ते ठावूक आहे. रविंद्र चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे कोणी नेत्यांची नावं घेऊन नाटक करत असेल तर सहन केलं जाणार नाही. सगळ्यांच्या घरचे पत्ते आम्हाला माहित आहेत. केसरकरांनी बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी सरकारमधून एकनाथ शिंदे सोबत बाहेर पडले. हिंदुत्वासाठी पुढे आले. शिवसैनिकांवर अन्याय होऊ दिला नाही. लोकसभेत दीपक केसरकर यांनी दिवसरात्र एक केलं हे आम्ही डोळ्यांनी पाहिल. त्यावेळी मॅन ऑफ द मॅच बोलल्यावर काहींना मिरच्या झोंबल्या. त्यामुळे कोणाला मध्ये यायचं त्यांना येऊ देत लोकसभेची परतफेड विधानसभेत राणे करणार आहेत. दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन नितेश राणेंनी केले
यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर, निलेश राणे, युवराज लखमराजे भोसले, प्रभाकर सावंत, संजू परब, अशोक दळवी, संजय आंग्रे आदी उपस्थित होते.