
मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.या यादीत कणकवलीमधून नितेश राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.आ.राणे तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून ९९जणांची यादी जाहीर करण्यात आली.या पहिल्या यादीत कणकवलीचे विद्यमान आमदार नितेश राणे यांच्या नावाचा समावेश आहे.आ.राणे हे तिस-यांदा निवडणूक लढवणार आहेत. विजयाची हॅटट्रिक मारण्यासाठी ते सज्ज आहेत.