नितेश राणेंचा धक्का ; बूथ प्रमुखांसह कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 21, 2024 14:25 PM
views 68  views

देवगड : देवगड तालुक्यातील नाडण बाईत वाडी येथील उबाठाचे बूथ प्रमुखांसह कार्यकर्त्यांनीआमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये  भाजप प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या विकास कामांचा धडाका पाहून त्यांनी केलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन आपण हा पक्षप्रवेश करत असल्याबद्दल त्यांनी यावेळी सांगितले.

जी काही  विकास कामे असतील ती आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागतील असा विश्वास प्रवेश करत असताना त्यांनी व्यक्त केला. यावेळी नितीन बाईत यांच्याबरोबर संतोष बाईत, विवेक बाईत, अक्षय बाईत, साहिल बाईत, प्राची बाईत, तेजस बाईत, यांच्यासह शेकडो ग्रामस्थ महिलांनी प्रवेश केला आहे.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम बाळ खडपे, संजय बोंबडी, स्थानिक कार्यकर्ते सतीश घाटे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, प्रभारी संतोष किंजवडेकर, अनिल पुरळकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन बाईत व सहकार्यानी भाजपामध्ये प्रवेश केल्याने उबाठा ठाकरे गटाला धक्का बसला आहे.