
देवगड : आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथे स्लो सायकलींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल होत. या स्पर्धेमध्ये ५५ जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पहिल्या गटात - प्रथम क्रमांक कु. अर्पित फाटक, द्वितीय क्रमांक कु. ध्रुव साट मतृतीय क्रमांक, कु. गंधर्व तावडे, दुसरा गट - प्रथम क्रमांक कु. जय शरदचंद्र फाटक, द्वितीय क्रमांक कु. पवन चव्हाण, तृतीय क्रमांक कु. गणराज सावंत, खुला गट - प्रथम क्रमांक कु.जशीथ साटम, द्वितीय क्रमांक अमित साटम, तृतीय क्रमांक कु. धनराज फाले, विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका युवक अध्यक्ष श्री अमित साटम, राजेंद्र शेट्ये, शैलेंद्र जाधव, संतोष फाटक,मंगेश लोके, युधीराज राणे, महेश मोंडकर, विशाल साटम, मंगेश पवार, विशाल कुवळेकर, निलेश शेट्ये, गणेश शेट्ये,ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.