निरंजन डावखरेंचा उद्या वैभववाडीत नागरी सत्कार !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 01, 2024 13:08 PM
views 255  views

वैभववाडी : कोकण पदवीधर निवडणुकीत विजयी झालेले व आमदारकीची हॅट्रिक पुर्ण केलेल्या आमदार निरंजन डावखरे यांचा उद्या वैभववाडीत नागरी सत्कार करण्यात येणार आहे.कणकवली विधानसभचे आम. नितेश राणे यांच्या हस्ते येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हा सत्कार सोहळा सकाळी १०.३०वा संपन्न होणार आहे.

 तालुक्यातील सर्व पदवीधर, शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक यांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.