कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदार संघ महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्राचाराला उदंड प्रतिसाद मिळत आहे. रविवारी कुडाळ तालुक्यातील कडावल श्री देव महापुरुष मंदिर, महापुरुष मित्रमंडळ कडावल बाजारपेठ यांचे कार्यकर्ते, कडावल रिक्षा युनियनचे पदाधिकारी तसेच कडावल गावातील शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गाव बैठका व कॉर्नर सभा घेत परिवर्तन घडवूया, विकासपर्व उभारूया महायुती ला साथ द्या असे आवाहन केलं. पिंगुळी गुढीपुर येथेहि उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निलेश राणे यांचं थेट लोकांशी वाढलेलं नेटवर्क महाविकास आघाडी समोर मोठं आवाहन उभं करत आहे. त्यांचे समवेत रणजित देसाई यांसह भाजपाचे पदाधिकारी सुद्धा मैदानात उतरले आहेत.