...तर संघर्ष करावा लागेल ; निलेश राणेंचा सावंतवाडी BSNL ला इशारा

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 12:52 PM
views 163  views

सावंतवाडी : मालवण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव पारित करून जे लोकेशन बीएसएनएलला टॉवरला दिले ते लोकेशन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना धमकी देऊन श्रेयवादासाठी बदलायला सांगितले. मात्र, कोणत्याही नियमाच्या बाहेर जर टॉवरचे लोकेशन बदलले तर आम्हाला संघर्ष करावा लागेल असा इशारा आज येथे माजी खासदार निलेश राणे यांनी सावंतवाडीतील बीएसएनएलचे च्या कार्यालयात भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना दिला.


दरम्यान लोकेशन का बदलायला सांगितले तर त्यांचा राजकीय हेतू त्यामुळे आज आम्ही या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या नियमात आहेत त्या नियमानुसारच करावे असल्याचे आम्ही त्यांना विनवणी केल्या असल्याचे देखील खासदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी भाजप नेते संजू परब, अशोक सावंत, आनंद शिरवळकर, गुरु मठकर, विनोद सावंत अनिल सावंत बंटी पुरोहित हेमंत बांदेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.