BIG BREAKING | निलेश राणे यांची 'स्फोटक' पत्रकार परिषद | ठाकरेंच्या बारसू दौऱ्यात मोठ्या कटाची शक्यता !

उद्धव ठाकरेंसारखी बाहेरची लोक बारसुच वातावरण बिघडवत आहेत
Edited by: भरत केसरकर
Published on: May 03, 2023 19:39 PM
views 154  views

सिंधुदुर्ग : निलेश राणे यांची ओरोस रेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद // 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसुत येणार आहेत, त्या दिवशी मोठं काहीतरी घडवण्याचे षडयंत्र होत असल्याचा निलेश राणेंचा मोठा दावा // बारसुमध्ये काही दिवसांपासून जे घडतेय ते सांगण्यासाठी मी ही पत्रकार परिषद बोलावली आहे // जनतेला व अधिकाऱ्यांना या गोष्टी कळाव्यात हा उद्देश // बोअरवेल मारण्याचे काम तिथे सुरू आहे // 6 तारखेला उद्धव ठाकरे तिथे येणार असल्याचे कळले // त्यासाठी मागच्या दरवाजाने अनेक तयारी सुरू आहेत, अस मला कळलं // जिलेटीन स्टिक गोळा  करण्याचे काम काही लोक करता आहेत // ते कशासाठी मला माहित नाही // ज्यांना 6 तारखेला काही घडवायचं आहे ते लोक असा प्रयत्न करता आहेत // ही बाहेरची लोकं आहेत // याची माहिती मी उदया पोलिसांना व फडणवीसांना 5 मे ला देणार // बाहेरच्या लोकांना 6 तारखेला वातावरण चिघळवायच आहे // हे बाहेरचे लोक आहेत यात उद्धव ठाकरेंचा काही संबंध नाही // हा विषय फार सिरीयस घ्या //  म्हणून मी पालकमंत्री यांना सांगणार आहे // जर हा विषय निलेश राणेंना कळतो याचा अर्थ काही तरी घडतंय म्हणूनच ना // जिलेटीन स्टीकचा हा एक विषय माझ्या कानावर आला अजून काही विषय असू शकतात // अस मटेरियल एका आंदोलनासाठी इथे यायला लागलं तर फार गंभीर विषय आहे // काहीतरी कट आहे त्याचा शोध पोलिसांनी आता घ्यायला हवा // राजन साळवीला कुत्र विचारत नाही // आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही // त्यांना हिंमत असेल तर त्यांनी बारसुत जाऊन दाखवावं // आम्ही बारसुत जाऊन आलो // जैतापूर प्रकल्प आणण्यासाठी आम्ही सर्व पणाला लावलं होतं //उद्धव ठाकरे बारसुला चिघळवायला येत असतील तर समर्थन किती मोठया प्रमाणात आहे हे दाखवण्यासाठी समर्थन मोर्चा काढावा लागेल // विरोध करायचा आणि ठेके मिळवायचा अशी उद्धवजींची पद्धत // पवार साहेब देशाचे नेते आहेत त्यांच्या पक्षासाठी;त्यांनी का अस केलं हे त्यांनाच माहीत // अजित पवार सोडून अध्यक्ष शरद पवारच रहावेत असे सर्वांना वाटते // उद्धव ठाकरेंसारखी बाहेरची लोक बारसुच वातावरण बिघडवत आहेत // हा प्रकल्प गेला तर यानंतर कोकणात 5 कोटींचा ही प्रकल्प येणार नाही // हा चौथा प्रकल्प जाईल // निलेश राणे यांची माहीती //