निलेश राणे आमदार झाल्यानंतरचा वाढदिवस न भूतो न भविष्यतो करणार : विशाल परब

विशाल परब यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Edited by: भरत केसरकर
Published on: March 17, 2024 08:05 AM
views 526  views

मालवण | भरत केसरकर : युवा उद्योजक, युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांनी माजी खासदार आणि महाराष्ट्राचे यंग ब्रिगेड नेतृत्व निलेश राणे यांना मालवणातील निलरत्न निवासस्थानी जात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला खूप आनंद होत आहे. आमच नेतृत्व आणि आपले राजकारणातील गुरु निलेश राणे हे 2024 मध्ये कुडाळ मालवणचे आमदार व्हावेत ही माझी मनोमन इच्छा असल्याच परब यांनी सांगितलं.


निलेश राणे आमदार झाल्यानंतर 17 मार्च 2025 ला त्यांचा वाढदिवस मी अशा पद्धतीने साजरा करेन की संपूर्ण देश नाही तर दुनिया याची आठवण ठेवेल. माझ्या राजकारणातील गुरु निलेश राणे आहेत.  त्यामुळे अशा माझ्या गुरूला मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. आज मालवणात त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देताना मनोमन मला आनंद होत आहे. आचांरसहिता असल्यामुळे आपण भव्य दिव्य कार्यक्रम यावर्षी  घेऊ शकलो नाही. याच मनात शल्य आहे.परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार महायुतीचा निवडून देऊन निलेश राणे यांना वाढदिवसाची मला भेट द्यायची आहे.तर मागील दोन पराभवाचा वचपा काढायचा आहे.तर सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघातील सर्वचे सर्व आमदार हे महायुतीचे निवडून देऊन निलेश राणे यांना 2025 च्या अगामी वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायची आहे. अशा पद्धतीच वक्तव्य याप्रसंगी विशाल परब याने केले. मला जीवनात नेहमीच साथ देणारे नेतृत्व निलेश राणे हे भविष्यात खूप मोठं व्हावेत. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. असेही विशाल परब म्हणाले.