
नागपूर : नागपूर रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर यांच्या स्मृतीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदार निलेश राणे यांनी अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कॅबिनेट मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अर्जुनजी खोतकर, आदी उपस्थित होते.










