
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे उद्या सोमवार दिनांक २८ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
माजी खासदार निलेश राणे हे सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे तसेच महायुती घटकपक्षाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १०.०० वाजता कुडाळ कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निलेश राणे उमेदवारी अर्ज दाखल करतील. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.