23 ला फटाकेही आपलेच, गुलालही आपलाच

निलेश राणेंनी सभा गाजवली
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 23, 2024 14:12 PM
views 349  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा होतोय शिवसेनेत प्रवेश // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार शिवसेनेत प्रवेश // माजी खासदार निलेश राणे यांचे भाषण // एक नवीन सुरुवात करतोय // राणे साहेबांच्या सावलीच्या बाहेर जाण्याचा कधीही प्रयत्न केले नाहीत आणि यापुढेही करणार नाही // मागील दहा वर्षात आमच्या कुटुंबाने खूप काही भोगलंय // आमचं घर पाडण्याचा प्रयत्न देखील झाला // मला अनेक संधी आल्या // विधानपरिषद ऑफर आली // पण मला माझं हक्काचं कुडाळ मालवण विधानसभा द्या हेच सांगितलं // दहा वर्षे गप्प नाही बसलो // दहा वर्षात मी माझी माती कधी नाही सोडली // लोकं नाही सोडली // आम्हाला अनेक पर्याय होते // लोकांनी माझी फक्त एकच बाजू बघितली // पण कधी कोणाला सांगितलं नाही // त्यावेळी कुटुंब माझ्या सोबत राहिलं // या दहा वर्षात अनेक लोकं माझ्या हातातून निघून गेल्या // अनेक निवडणुका बघितल्या // ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुका बघितल्या // कार्यकर्ते जिंकले त्यावेळी खूप आनंद व्हायचा // दहा वर्षात मतदार संघ ओसाड पडला // जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय याच मतदार संघात येते // या मतदार संघाचे आमदार दहा वर्षांपूर्वी नारायण राणे होते // मागच्या दहा वर्षात आमदाराने एक वास्तू उभी नाही केली // एक स्पोर्ट्स कॉम्पलेक्स नाही // कणकवलीत नितेश राणे यांनी स्पोर्ट्ससाठी अनेक योजना आणल्या // मतदार संघाची ओळख पुन्हा आणायची आहे यासाठीच ही धडपड सुरु आहे // मी त्यांच्यावर दीड वर्षे कधीच टीका केली नाही // मी कधीच ठेकदारी करणार नाही // कधीच ठेकेदाराला फोन करणार नाही // खोटं काही करणार नाही // निलेश राणे यांनी शपथ घेऊन सांगितलं // ठेकेदारीत रस्त्यांची वाट लावली // ह्यांचा मित्रपरिवार ठेकदार // यांचं घराणं ठेकेदार // मेडिकल कॉलेज कर्जावर उभं आहे // आमचं राहतं घर पाडायला आले ते घर कर्जावर आहे // आम्हाला कोर्टाने अधिकृत ठरवलं // आमची ठाकरेंशी काही दुष्मनी नाही // आता तसे ते राहिले नाहीत // ऍक्शन आली तर रिऍक्शन येणारच // पराभव झाले ते झाले // येणाऱ्या 23 तारिखला महायुतीचेच फटाके फुटतील // गुलालही आपलाच असणार // येथील आमदाराने दांडा उचलला तर त्याला उचलून घेतले // तोच दांडा माझ्या हातात असता तर किती बदनामी केली असती?// आमची सभा फेल करण्यासाठी आमदार वैभव नाईक सकाळ पासून प्रयत्न करत होते // ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे यांची सभा आहे, ती फेल जाणार नाही // कुडाळ midc बंद पडायला आली आहे // सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोध केला // सी वर्ल्ड प्रकल्पस्थळी राणे कुटुंबाच्या जमिनी असल्याचे सांगितले // राणे कुटुंबाचा पराभव झाला // पण जमिनी राणे कुटुंबाच्या मिळाल्या नाहीत // निलेश राणे सभा गाजवली //