
कुडाळ : आज सकाळी पोखरण-कुसबे येथील नागरिकांनी उबाठा गटात कुसबे येथील महेंद्र जाधव, अजय जाधव, अस्मिता जाधव, अश्विनी जाधव, आकाश जाधव, द्रौपदी जाधव, विलास जाधव, विनिता कदम, आनंद जाधव आदी भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता. मात्र आज रात्रीच महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे पोखरण दौऱ्यावर असताना उबाठा गटात प्रवेश केलेल्या या सर्वांनी निलेश राणे यांची भेट घेऊन आपली वैभव नाईक यांनी फसवणूक केली असल्याचे सांगितले. यावेळी आपण कणकवली येथे गेलो असता तुमच्या गावातील बुद्ध विहारासाठी पैसे देतो असे सांगून आमचा प्रवेश दाखवला असा आरोप करत ते पुन्हा महायुतीत आले.
यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महिला तालुकाध्यक्ष सुप्रियाताई वालावलकर, देवेंद्र सामंत, ओरोस मंडल अनुसूचित जाती जमाती मोर्चा मंडल अध्यक्ष विनोद कदम, सचिन सावंत, प्रशांत तावडे, संदीप बागवे, रुपेश सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.