
कुडाळ : महायुती होणार की नाही हे आता सांगू शकत नाही. परंतु आपण सर्व जागांवर तयारी केली पाहिजे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कुडाळ मालवण मध्ये ज्या पद्धतीने निलेश राणे काम करत आहेत, ते पाहता येथील जणता निलेश राणे यांच्या सोबत आहे. युतीतील घटकपक्ष आहोत हे निलेश राणे यांनी शेवटपर्यंत जपले याचा मी साक्षीदार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. कुडाळ येथील शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.










