
मालवण : कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान आणि त्यावरील उपाययोजनांबाबत आमदार निलेश राणे यांनी आज मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी वन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे अशी मागणी करताना शेतीचे नुकसान रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात यावा यावर चर्चा झाली.