
कुडाळ : शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी प्रांत कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, यांसह, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आदी उपस्थित होते.