
मालवण : सरपंच, वाळू, चिरे यासह विविध संघटनांना येणाऱ्या अडचणी माजी खासदार निलेश राणे जाणून घेणार आहेत. शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 :30 वाजता हडी ग्रामपंचायत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.
सरपंच, वाळू, चिरे यासह विविध संघटनांनी येणाऱ्या समस्यांबाबत माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेत एक बैठक घ्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी हडी ग्रामपंचायत येथे ही बैठक होणार आहे. सर्व संघटनांच्या समस्या जाणून घेऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली संयुक्त रित्या पाठपुरावा करून त्या त्या खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर आवश्यक सगळ्या विषयाची सोडवणूक करण्यात येणार आहे अशी माहिती चिंदरकर यांनी दिली आहे.