जनतेचे आभार, वैभव नाईकांना शुभेच्छा ; काय म्हणाले निलेश राणे ?

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: November 23, 2024 19:16 PM
views 302  views

कुडाळ :  कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मधील मतदारांचे आभार व्यक्त करताना असे प्रतिपादन केले की मी मनापासून कुडाळ मालवण मधील जनतेचे आभार मानतो. 

मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन मी फक्त उमेदवार होतो पण खरे योद्धे तर माझे कार्यकर्ते आहेत. माझे वडील नारायण राणे साहेब आणि आई या दोघांचेही माझ्या यशामध्ये बहुमोल योगदान आहे. आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये हा त्यांच्यामुळेच शक्य झाला. मी यापूर्वी सांगितलं होतं की मी कोणाला पराभूत करण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही तर माझ्या हातून या मतदारसंघासाठी काहीतरी चांगलं घडेल यासाठी मी निवडणूक लढवली होती माझे विरोधी उमेदवार उबाठा पक्षाचे वैभवजी नाईक यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी चांगली फाईट दिली पण माझे सहकारी जिंकले. आमचा पक्ष जिंकला आणि महायुती जिंकली. आता पुढील पाच वर्षे मतदार संघाच्या विकासासाठीच काम करायचा आहे.

 आपण सर्वांनी दिलेली साथ आणि आशीर्वाद हे माझ्यासाठी बहुमोल आहेत.  असे प्रतिपादन निलेश राणे यांनी तहसीलदार कार्यालय येथे विजयाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे,  अशोक सावंत आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते