लाडक्या बहिणीं सांगतात आमचे मत निलेश राणे यांनाच..!

लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 होणार याचाही अधिक आनंद
Edited by:
Published on: November 18, 2024 16:50 PM
views 199  views

मालवण : महाराष्ट्रात महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. या योजनेमुळे महिला वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना महायुतीला पाठबळ देणारी ठरणारी ठरणार आहे.थेट महिलांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने महिला समाधानी असल्याचे चित्र आहे. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांच्या प्रतिक्रिया आनंदी आहेत. योजनेच्या माध्यमातून पाच महिन्यात १५०० रुपयाप्रमाणे ७ हजार ५०० रुपये जमा झाले आहेत. महिना दीड हजार रुपये महिलांना आधार देणारे ठरत आहे. अगदी गरीब महिलांपासून ते मध्यमवर्गीय महिला या योजनेचे स्वागतच करत आहेत. योजनेविषयी महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या तर लाडक्या भावाला आमचे मत देणार असल्याचे महिला वर्ग बिनधास्तपणे बोलत आहे. 

महिलांच्या प्रतिक्रिया ::

माझे ५५ वर्षात बचतगटाचे खाते वगळता बँक खाते नव्हते. त्यामुळे माझ्याकडे स्वतःच्या इतक्या वर्षात कोणत्याच ठेवी नव्हत्या. पती नोकरीला असल्याने तशी कधी गरज भासली नाही. पण उतारवयात पैशाची गरज असताना शासनाची लाडकी बहीण योजनेच्या रूपाने संसारात लक्ष्मी नांदत आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात युतीचा उमेदवार आहे त्यालाच म्हणजे लाडक्या भावाला मत देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे. 

आमची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. पती मोलमजुरी करतात. दुसरा कोणताच उत्पन्नाचा मार्ग नाही. त्यात मुलगा शाळेत जातो. त्याचा अभ्यास ऑनलाइन येतो. आमच्याकडे मोबाईल घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. मुलाचा अभ्यास शेजाऱ्यांच्या मोबाईलवर यायचा. त्यामुळे मला दुसऱ्यांवर अवलंबून राहवे लागायचे. त्याचदरम्यान लाकडी बहीण योजना आल्याने मुलाच्या अभ्यासासाठी मला मोबाईल घेणे सहज शक्य झाले. पाच टप्प्याचे माझ्या खात्यात ७५०० रुपये जमा झाले. आता ही रक्कम वाढून 2100 होणार याचाही आनंद आहे. 

महागाई झळा सोसाव्या लागत असल्या तरी आमच्या खात्यात जमा होणारी रक्कम माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांना फायदेशीर ठरली आहे. अडल्यावेळी कुटुंबातील व्यक्तींकडे पैसे मागावे लागायचे. मात्र या योजनेमुळे हक्काचे पैसे खात्यात असल्याने चिंता वाटत नाही. ही योजना यापुढेही सुरू रहावी. मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेली योजना या निवडणुकीत गेमचेंजर ठरेल, अशा बोलक्या प्रतिक्रिया महिला वर्गातून येत आहेत.