
कुडाळ : माणगाव खोऱ्यातील निवजे गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. वैभव नाईक यांच्याकडून विकास कामे होत नसल्यामुळे केवळ आश्वासने दिली जात असल्याने निलेश राणे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली विकास करण्याच्या हेतूने आपण प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
यावेळी विकास जाधव, गौतम जाधव, दत्ताराम पालव, किरण जाधव, निलेश पालव, आबा पालव, साईनाथ हेवालेकर, न्हानू सुद्रिक, महादेव सुद्रिक, सागर जाधव, प्रवीण गाड, गणपत जाधव, अन्नपूर्णा आजगावकर, तनया जाधव, केशव जाधव, सावित्री जाधव, विठ्ठल पालव, प्रकाश जाधव, प्रियंका जाधव, सिताराम चव्हाण, नीलकंठ लाड, विजय जाधव, संतोष चव्हाण, मधुकर चव्हाण, अर्जुन पालव, आप्पा केदारे, अस्मिता जाधव, प्रीती तळेकर, वसंत जाधव, वर्षा जाधव, रामचंद्र चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, सुवासिनी चव्हाण, यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी विश्वास गावकर, आनंद शिरवलकर, दिनेश वारंग, स्वरूप वाळके, अरविंद करलकर, रत्नाकर जोशी गणेश पालव, प्रभाकर वारंग आदी शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.