
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी राणे कुटुंबाने मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार नारायण राणे, सौ. नीलम राणे, सौ. प्रियंका राणे, कु. अभिराज राणे उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ दे असे साकडे यावेळी घालण्यात आले.