
कुडाळ : शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ मालवण मतदार संघाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोणतंही मोठं शक्तिप्रदर्शन न करता थेट प्रांत कार्यालयात येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.