निलेश राणेंनी वेधलं लक्ष ; 4 तासात कर्मचारी नियुक्त !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 30, 2024 13:17 PM
views 135  views

मालवण : मालवण शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क साधून मालवणातील यंत्रणा सक्षम करीत कर्मचारी वाढवण्याची मागणी केली. आरोग्य विभागाने त्या मागणीची तात्काळ दखल घेत कर्मचारी नियुक्त केले आहेत. अशी माहिती भाजपा मालवण शहरअध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली. 

मंगळवारी मालवण नगरपरिषद येथे निलेश राणे यांनी भेट घेऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य अधिकारी यांनी कर्मचारी वर्ग कमी असल्याचे सांगितले. त्याची तात्काळ दखल निलेश राणे यांनी घेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क करून हत्तीरोग प्रतिबंध उपाययोजना राबवण्यासाठी मालवण शहरात जादा कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली. 


आरोग्य विभागाकडून चार तासात कर्मचारी नियुक्त


निलेश राणे यांच्या मागणी नंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या बैठकी नंतर डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यासाठी तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच अन्य 20 कर्मचारी तपासणी व अन्य पथक माध्यमातून कार्यरत असणार आहेत. जनतेला तात्काळ सेवा मिळाली पाहिजे. कोणतीही समस्यां असेल तर ती दूर केली जाईल. असे सांगत जनतेला सेवा सुविधा उपलब्ध होण्यासाठी जे आवश्यक आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.