निलेश राणे यांनी केली बौद्धवाडीतील पुलाची पाहणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 27, 2024 11:50 AM
views 246  views

मालवण : तालुक्यातील वडाचा पाट बौद्धवाडी येथील ओहोळावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी पुलावरून जाते. पाण्याचा वेग जास्त असल्याने वाहतूक बंद असते. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केली. आज निलेश राणे यांनी वडाचा पाट बौद्धवाडी येथील त्या पुलाची पाहणी केली. पुलाची उंची वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार मानले. 


यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष गावकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राकेश सावंत, सरपंच सोनिया प्रभूदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, विनायक प्रभुदेसाई, दर्शना कासले, गुरूदास पालव, प्रथमेश पालव, श्रीकांत पाटकर, दिनेश चव्हाण, प्रवीण पाताडे, बाबी कासले, अरुण कासले, रोहित कासले, श्रीकृष्ण कासले, संतोष कासले, रामचंद्र कासले, भानुदय कासले, पुरुषोत्तम कासले, उद्योजक दयानंद प्रभुदेसाई, यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.