
मालवण : मालवण तालुक्यातील त्रिंबक व लगतच्या परिसराला सोमवारी सायंकाळी चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये येथील गावडे कुटूंबाच्या घराचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या माध्यमातून गावडे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत केली आहे.
मंगळवारी त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर याच्या हस्ते तारामती गावडे यांना ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, पळसंब सरपंच महेश वरक, दिपक सुर्वे, संतोष गावकर, त्रिंबक उपसरपंच आशिष बागवे, सदस्य सौ. सपना तेली, नेहा, सुचिता, संतोषी, रोहित, पो. पाटील सकपाळ ग्रामसेवक कामतेकर, बाळा साटम, संतोष घाडीगांवकर, शेखर सुतार तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.