
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायतची निवडणूक होत असून यासाठी या गावातील तरुण नेतृत्व निलेश दिगंबर परुळेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याची माहिती तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिली आहे.
निलेश परुळेकर हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून कुशेवडा गावात मोठा जनसंपर्क असून त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. तसेच एक युवा नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहीले जाते. कुशेवाडा गावातील स्वच्छतेच्या चळवळीतही त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिली आहे.