
सावंतवाडी : कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीच्या कै. सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय, कणकवलीचे लिपीक निलेश पारकर यांना श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ, महाराष्ट्र या संस्थेमार्फत हौसाई मल्टिपर्पज हॉल, बहिरेश्वर, (ता. करवीर, जि. कोल्हापूर ) याठिकाणी राजश्री शाहू महाराज शैक्षणिक पुरस्कार २०२५ ने राजू सुर्यवंशी (मा. सभापती, करवीर) सर्जेराव मोरे (राज्यस्तरीय कुस्ती निवेदक) रविंद्र पाटील (प्रसिद्ध उद्योगपती, करवीर) निवृत्ती दिंडे (सरपंच बहिरेश्वर) तानाजी कु-हाडे (अध्यक्ष, श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ, महाराष्ट्र) बी. एस. कांबळे (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डाएट, सिंधुदुर्ग) यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे होते. या सत्कारानंतर श्री. पारकर यांनी म्हटले की, समाजामध्ये निरपेक्ष भावनेने कार्य करीत असल्याने, मला असे अनपेक्षितरीत्या पुरस्कार आणि सन्मान होत असतात. असे पुरस्कार मिळाल्याने शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यास प्रेरणा मिळते. बी. एस. कांबळे (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डाएट, सिंधुदुर्ग) यांच्या माध्यमातून मला या भागात कार्यक्रमास उपस्थित राहून हा बहुमोल असा पुरस्कार स्वीकारण्याचे सौभाग्य मिळाले आहे. त्याबद्दल मी या संस्थेचा ऋणी आहे. मी यापुढेही माझे हे काम अविरतपणे सुरु ठेवणार आहे अशा भावना व्यक्त केल्या.
श्री. पारकर हे जिल्हयातील विविध मंडळांमध्ये कार्यरत असून त्या मंडळांमार्फत ते नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात. तसेच ते सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असून त्यांच्या संघटनात्मक, सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराने त्यांना भविष्यात प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल, असे मत बी. एस. कांबळे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक पुरस्कार मिळालेबद्दल कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीच्या डॉ. धनश्री सावंत तायशेटे (अध्यक्षा) डॉ. संदीप सावंत (चेअरमन) श्री.डी.एम. नलावडे (सचिव) डॉ. एस. एन. तायशेटे (उपचेअरमन) श्री. एम.ए. काणेकर (उपचेअरमन) श्री.एस.व्ही. सोनुर्लेकर (प्राचार्य, डी. एड. कॉलेज, कणकवली) श्री. जी. एन. बोडके (मुख्याध्यापक, एस. एम. हायस्कूल, कणकवली) या संस्थेतील सर्व विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, राजेंद्र कांबळे (प्राचार्य, डाएट, सिंधुदुर्ग) सर्व अधिव्याख्याता, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अनिल राणे (जिल्हाध्यक्ष) गजानन नानचे (जिल्हा कार्यवाह तथा विभागीय कार्यवाह, कोल्हापूर) अनिल माने (राज्याध्यक्ष) शिवाजी खांडेकर (राज्य सरकार्यवाह ) श्रीमती. प्रिया पवार (उपाध्यक्षा) राज्यातील सर्व विभागीय कार्यवाह, वाय. पी. नाईक (संस्थापक, ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडी) जावेद शेख, एस. आर. मांगले, विनायक गांवस, वैभव केंकरे (सावंतवाडी) तसेच जिल्हयातील विविध शिक्षक संघटना पदाधिकारी व निलेश पारकर मित्रमंडळीनी प्रत्यक्ष भेटून व मोबाईलद्वारे अभिनंदन करीत त्यांना भावी कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.