निगुडेच्या सरपंच उपसरपंचांसह सदस्य शिवसेनेत

Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2025 19:27 PM
views 52  views

सावंतवाडी : निगुडेचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच, उपसरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी शनिवारी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या पुढाकाराने शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क मंत्री सिंधुदुर्ग उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश घेण्यात आला. 

शिवसेनेतर्फे कुडाळ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हा पक्षप्रवेश करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्गचे संपर्क मंत्री रविंद्र फाटक, शिवसेनेचे उपनेते संदेश आंग्रे, जिल्हाप्रमुख संजू परब, दत्ता सामंत, महिला जिल्हाध्यक्ष निता सावंत कविटकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी निगुडे सरपंच लक्ष्मण गंगाराम निगुडकर, उपसरपंच गौतम मधुकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य शमिता संदीप नाईक,  माजी सरपंच दिनेश कृष्णा राणे, माजी सरपंच भिकाजी नारायण गावडे, माजी उपसरपंच आपा भीसाजी गावडे, माजी व्हाइस चेअरमन व उपसंचालक शामराव विठ्ठल म्हाडगुत, ग्रामस्थ जनार्दन महादेव पवार, वंदना अनंत पवार, वनिता भगवान नाईक, रंजीता राघोबा नाईक, सुनिता सिताराम नाईक, लक्ष्मी मधुकर कुणकेकर आदींनी प्रवेश केला.