
बांदा : निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी भात शेतीच्या नुकसानी संदर्भात तालुका कृषी अधिकारी गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं होतं. त्याची दखल घेत आज तालुका कृषी अधिकारी गोरे यांनी निगुडे भातशेती बांधावर येत पाहणी केली. यावेळी बांदा सहाय्यक कृषी अधिकारी सद्गुरु, निगुडे कृषीअधिकारी पल्लवी सावंत, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, माजी सरपंच समीर गावडे, शेतकरी अशोक सावळ, प्रकाश गावडे, शर्मिला नाईक, गुरुदास निगुडकर, पोलीस पाटील, सुचिता मयेकर आदी उपस्थित होते.
यावेळी गोरे यांनी कृषी अधिकारी पल्लवी सावंत, पोलीस पाटील यांना तातडीने पंचनामे लवकर पूर्ण पाहिजे अशी सूचना दिली. सर्वांनी सहकार्य करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया असंही यावेळी सांगितलं. तसेच त्यांनी रोणापाल, मडुरा, आदी भागातही भात शेतीची पाहणी केली. यावेळी रोनापाल माजी सरपंच सुरेश गावडे, मडुरा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य उल्हास परब, मडूरा तलाठी एस आर नाईक , कोतवाल नाना वेंगुर्लेकर रोनापाल ,मडूरा शेतकरी उपस्थित होते.












