
सावंतवाडी : निगुडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊली पुन: प्रतिष्ठापन सोहळा फेब्रुवारी महिन्यात होणार असून निगुडे श्री देवी माऊली देव देवतांचे तरंगकाठी, पालखी प्रत्येक घरोघरी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याकरिता येत आहेत.
सोमवार दिनांक २३ डिसेंबरपासून श्री देवी माऊली मंदिर निगुडे येथून कार्यक्रमाला सुरुवात झाली. निगुडे कासकरटेंब येथून तरंगकाठी, पालखी सोहळा प्रारंभ झाला. त्यानंतर त्याच दिवशी निगुडे आरोसकरटेंब येथे देवतांचे आगमन झालं. रात्रौ देव वस्तीला थांबणार असून दुसऱ्या दिवशी निगुडे नवीन देऊळवाडी, दुरेकरवाडी, राणेवाडी, मधलीवाडी व त्यानंतर गजनेवाडी, पाटीलवाडी, मार्गे तेलवाडी, जुनीदेऊळवाडी व सर्वात शेवटी गावठणवाडी असा कार्यक्रम होणार असून याची दखल गावातील ग्रामस्थांनी, महिलांनी घ्यावी देवतांचे आगमन होत असताना त्या त्या वाडीतील प्रत्येक नागरिकांनी सदर पालखी, तरंगाठी सोबत राहायचं आहे तसेच रांगोळी घालून प्रत्येक वाडीमध्ये देवदेवतांच्या आगमनाचे स्वागत करावयाचे आहे असं आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समितीने केलं आहे.