निगुडे १ नंबर शाळेच्या सुविधांसाठी मदत

अनेक कामे मार्गी | अन्य कामांसाठी मदतीचं आवाहन
Edited by: भगवान शेलटे
Published on: November 11, 2025 13:40 PM
views 159  views

बांदा : जि. प. शाळा निगुडे नंबर १ साठी शाळेच्या विविध भौतिक सुविधांसाठी माजी विद्यार्थी तसेच  ग्रामस्थांनी शाळेची संपूर्ण लाईट फिटिंग, पाण्याच्या टाकीची उंची वाढवणे व संपूर्ण नवीन पाईपलाईन करणे या कामासाठी न्यू इंग्लिश स्कूल मडूराचे माजी मुख्याध्यापक गंगाराम कुरबा गावडे यांनी रुपये १०,०००/-, ममता महादेव गावडे रुपये ३०००, लक्ष्मी नारायण पोखरे रुपये २०००, दीपक बाबी निगुडकर  रुपये १०००, शंकर पुंडलिक निगुडकर रुपये १०००, शाळेचे मुख्याध्यापक नारायण पुंडलिक नाईक रुपये ५००० अशी आर्थिक मदत केली. वरील सर्व कामे करण्यास हातभार लावल्यामुळे मुलांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. तरी अन्य कामांसाठी अजून काही मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे अजून कोणाला मदत करावयाची असल्यास शाळेचे मुख्याध्यापक नारायण नाईक सर (9420740646) यांच्याशी सपर्क करावा. वरील सर्व दात्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गावडे व सर्व सदस्य यांनी आभार मानलेत. 

दरम्यान, निगुडे गावचे रहिवासी व सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले सुधाकर राणे कुटुंबियांकडूनही शाळेस कपाट भेट देण्यात आलं. त्यांचेही आभार शाळा व्यवस्थापन समितीने मानले.